आदर्शला पाटील,चव्हाणांची मंजुरी - विलासराव

इरादा पत्रावर मी सही केली असली तरी त्याधी तत्कालीन अर्थमंत्री जयंत पाटील आणि महसूल मंत्री अशोक चव्हाण यांनी मंजुरी दिली आहे. इरादा पत्रावर सही केली तरी दिवस आठवत नाही आणि तारीख माहीत, असे केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांनी दुसऱ्या दिवशीच्या चौकशी दम्यान सांगितले.

Updated: Jun 27, 2012, 02:06 PM IST

www.24taas.com,मुंबई

 

इरादा पत्रावर मी सही केली असली तरी त्याधी तत्कालीन अर्थमंत्री जयंत पाटील आणि महसूल मंत्री  अशोक चव्हाण यांनी मंजुरी दिली आहे. इरादा पत्रावर सही केली तरी दिवस आठवत नाही  आणि  तारीख माहीत, असे केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख  यांनी दुसऱ्या दिवशीच्या चौकशी दम्यान सांगितले.

 

आदर्श सोसायटीच्या घोटाळ्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी विलसरावांकडे बोट दाखवलं. मात्र, विलासराव देशमुखांनी अशोक चव्हाणांकडे बोट दाखवत हात झटकले होते. आज त्यापलीकडे जाऊन विलासराव यांनी जयंत पाटलांनाही यात ओढले. त्यामुळे आता अशोक चव्हाण काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

 

कालच्या साक्षीत त्यांनी तत्कालीन महसूल मंत्री अशोक चव्हाण आणि अधिका-यांकडे बोट दाखवलं होतं. महसूल खात्याने निर्णय घेतले, मी फक्त सही केली. अशी सह्याजीरावांची भूमिका विलासरावांनी घेतली. काल सुशीलकुमार शिंदेंनी नोंदवलेल्या साक्षीत विलासरावांकडे बोट दाखवत संपूर्ण जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला होता.

 

जमिनीचा ताबा कोणाकडं याबाबत आपल्याला कल्पना नव्हती तसंच प्रकाश पेठे मार्गाची रुंदी कमी करणा-या निर्णयाचीही कल्पना नसल्याचं त्यांनी म्हटलंय. जमीन देण्यासंदर्भातल्या निर्णयाची जबाबदारी महसूल खात्याकडं असते. महसूल खात्याचे प्रधान सचिव आणि मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव सर्व माहिती मुख्यमंत्र्यांना देतात. फाईल ओके असेल तरच मुख्यमंत्री सही करतात. अशा प्रकारे विलासरावांनी आदर्श प्रकरणाची जबाबदारी अशोक चव्हाण आणि अधिका-यांकडं ढकललीय. २००१ साली आदर्श सोसायटीबाबत कन्हैयालाल गिडवाणींचे पत्र मिळालं होतं. पण प्रधान सचिवांना तपासण्यासाठी दिलं होतं. पुढे त्यावर काय कारवाई झाली कल्पना नसल्याचंही विलासराव म्हणाले.