www.24taas.com, मुंबई
लिलावती हॉस्पीटलमध्ये अँजिओग्राफी झाल्यानंतर आता उद्धव ठाकरे यांची प्रकृती उत्तम आहे. भाजप नेते गोपीनाथ मुंडेंनी आज उद्धव ठाकरेंची भेट घेतली. उद्धव ठाकरे यांची विचारपूस करण्यासाठी नेते मातोश्रीवर येतायत तसच अनेकांनी फोनवरूनही त्यांच्या तब्येतीची विचारणा केलीय.
दरम्यान लीलावतीतल्या डॉक्टरांच्या पथकानं मातोश्रीवर काल रात्री पुन्हा उद्धव यांच्या प्रकृतीची तपासणी केली होती. त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे आणि उद्धव अशी तिघांनी पुढील उपचारांबाबत चर्चा केली. काल छातीत दुखू लागल्यानं उद्धव ठाकरे उपचारासाठी लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते त्यावेळी त्यांच्यावर एँजिओग्राफी करण्यात आली. ही बातमी समजताच रायगड दौरा अर्धवट सोडून राज ठाकरे यांनी तत्काळ लिलावती हॉस्पिटल गाठलं. दोन भावांमधली ही भेट अविस्मरणीय अशीच होती. य़ातून राजकारणापेक्षा नात्याची वीण घट्ट असल्याचं पुन्हा एकदा समोर आले आहे.
राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर आनंदच होईल, असं म्हणतायत रिपाईंचे अध्यक्ष रामदास आठवले. उद्धव ठाकरेंच्या आजारपणाच्या निमित्तानं राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याच्या पार्श्वभूमीवर आठवले यांनी हे वक्तव्य केलं. अर्थात याबाबतचा निर्णय दोन्ही भावांनी घ्यायचा आहे, असं आठवले म्हणाले. राज ठाकरे चांगले संघटक आहेत अशा शब्दांत त्यांनी राज यांची तारीफही केली.
पाहा व्हिडिओ
[jwplayer mediaid="140890"]