एनडीएच्या बैठकीला शिवसेनेची दांडी

व्युहरचना ठरविण्यासाठी भाजपने आपल्या मित्र पक्षांची बैठक बोलावली होती. परंतु एनडीएच्या बैठकीला शिवसेनेने दांडी मारण्याचे ठरविले आहे. त्यामुळे नवी चर्चा सुरू झाली आहे.

Updated: Jun 17, 2012, 12:34 PM IST

www.24taas.com, नवी दिल्‍ली

 

तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसला कोंडीत पकडल्यानंतर कोणाचे नाव पुढे करायचे हा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, प्रणव मुखर्जी यांना राष्ट्रपती पदासाठी उमेदवार जाहीर करून ममतांना काँग्रेसने शह दिला. राष्ट्रवादीचे शरद पवार आणि मुलायम सिंह यांनी काँग्रेसबरोबर असल्याचे सांगतल्याने फेट मिटला. मात्र, पुढील व्युहरचना ठरविण्यासाठी भाजपने आपल्या मित्र पक्षांची बैठक बोलावली होती. परंतु एनडीएच्या बैठकीला शिवसेनेने दांडी मारण्याचे ठरविले आहे. त्यामुळे नवी चर्चा सुरू झाली आहे.

 

शिवसेनेने माघार घेतल्याने राष्‍ट्रपतीपदाच्‍या उमेदवारावरुन राष्‍ट्रीय लोकतांत्रिक आघाडीमध्‍ये (एनडीए) फुट पडली आहे. एनडीएमधील एक गट प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा देण्यासाठी सहमत आहे. तर दुसरा गट पी.ए.संगमा यांच्‍या पाठिशी आहे. त्‍यातच भाजपचे नेते राम जेठमलानी यांनी राष्‍ट्रपतीपदाच्‍या शर्यतीत उतरण्‍याचा निर्धार व्‍यक्त केला आहे. त्‍यामुळे भाजपच्‍या कोर समितीच्‍या बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही. आज पुन्‍हा यासंदर्भात बैठक होणार आहे.

 

एनडीएचा घटक पक्ष शिवसेनेने आपली भूमिका मांडण्यासाठी दोन दिवसांची मुदत दिली आहे. खासदार संजय राऊत यांनी कोणाला पाठिंबा द्यायचा याचा निर्णय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे घेतील, असे सांगितले. त्यामुळ दोन दिवस वाट पाहावी लागणार आहे. तर एनडीएच्‍या बैठकीत शिवसेनेचा कोणताही प्रतिनिधी सहभागी होणार नसल्‍याचे  संजय राऊत यांनी स्पष्ट केल्यामुळे एनडीएमध्‍ये अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

दरम्यान, शिवसेनेने ए पी जे अब्दुल कलाम यांना पाठिंबा दिला आहे. कलाम यांच्या शिवाय अन्य उमेदवार लायक नाही, असे शिवसेनेने म्हटले आहे. त्यामुळे अन्य उमेवारांना पाठिंबा न देण्याचा निर्णय घेतला आहे.