कन्हैय्यालाल गिडवाणींना पुन्हा अटक

आदर्श घोटाळ्याप्रकरणी कन्हैय्यालाल गिडवाणींना पुन्हा सीबीआयने अटक केली. घोटाळ्यातील आरोप सौम्य करण्यासाठी गिडवाणी यांनी लाच दिली होती. याप्रकरणात त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांची आज जामीनावर मुक्तता करण्यात आली होती. परंतु आज पुन्हा सीबीआयने त्यांना अटक केली. आज दिवसभरात चार जणांना अटक झाली आहे.

Updated: Mar 20, 2012, 04:42 PM IST

www.24taas.com, मुंबई

आदर्श घोटाळ्याप्रकरणी कन्हैय्यालाल गिडवाणींना पुन्हा सीबीआयने अटक केली. घोटाळ्यातील आरोप सौम्य करण्यासाठी गिडवाणी यांनी लाच दिली होती. याप्रकरणात त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांची आज जामीनावर मुक्तता करण्यात आली होती. परंतु आज पुन्हा सीबीआयने त्यांना अटक केली. आज दिवसभरात चार जणांना अटक झाली आहे.

मुंबईतील आदर्श घोटाळा प्रकरणातील आरोपातून मुक्तता करण्यासाठी लाच दिल्याप्रकरणी  माजी आमदार कन्हैयालाल गिडवाणी, त्यांचा मुलगा कैलास आणि दोन वकीलांना सीबीआयने अटक केली होती. आदर्श हौसिंग सोसायटी घोटाळा प्रकरणात अडकलेले गिडवाणी या घोटाळ्यातील प्रमुख संशयित आहेत. आदर्श सोसायटीच्या निर्मितीपासूनच गिडवाणी या सोसायटीचे प्रमुक सदस्य आहेत.

आरोप सौम्य करण्यासाठी गिडवाणी यांनी तब्बल सव्वा कोटी रुपयांची लाच दिल्याची धक्कादायक माहिती सीबीआयला याप्रकरणाच्या तपासात मिळाली होती. गिडवाणी पिता पुत्रांबरोबर सीबीआयचे वकील मंदार गोस्वामी आणि जे. के. जिग्यासी यांना सीबीआयने याप्रकरणी अटक केली.  जिग्यासी वकीलामार्फत त्यांनी २१ लाख रूपये दिले होते.