आदर्श बिल्डींग

आबांनी केली जयंतरावांची 'आदर्श' पाठराखण

आदर्श घोटाळाप्रकरणी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांना चौकशी आयोगानं प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश देण्यात आलेत.. मात्र या घोटाळ्यात त्यांचा हात नसल्याचं सर्टिफिकेट देत गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी पाठराखण केलीय. तसंच मंत्रालयातल्या आगीत घातपात नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Jul 1, 2012, 10:24 AM IST

आदर्श घोटाळा : १४ आरोपी आणखी अडचणीत

आदर्श घोटाळाप्रकरणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह १४ आरोपी आणखी अडचणीत येण्याची शक्यता आहे. या आरोपींवर जन्मठेपेची शिक्षा असलेल्या आरोपांअतर्गतही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सीबीआयनं विशेष कोर्टात दिली आहे.

May 29, 2012, 10:11 AM IST

कन्हैय्यालाल गिडवाणींना पुन्हा अटक

आदर्श घोटाळ्याप्रकरणी कन्हैय्यालाल गिडवाणींना पुन्हा सीबीआयने अटक केली. घोटाळ्यातील आरोप सौम्य करण्यासाठी गिडवाणी यांनी लाच दिली होती. याप्रकरणात त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांची आज जामीनावर मुक्तता करण्यात आली होती. परंतु आज पुन्हा सीबीआयने त्यांना अटक केली. आज दिवसभरात चार जणांना अटक झाली आहे.

Mar 20, 2012, 04:42 PM IST

काँग्रेसमधून कन्नैयालाल गिडवाणी निलंबित

कन्नैयालाल गिडवाणी यांना काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले आहे. कालच त्यांना लाचप्रकरणात अटक करण्यात आली होती. काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आल्याची घोषणा प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी आज केली.

Mar 7, 2012, 10:47 PM IST

कन्हैयालाल गिडवानीसह चौघांना अटक

मुंबईतील आदर्श घोटाळा प्रकरणातील आरोप सौम्य करण्यासाठी लाच दिल्याप्रकरणी काँग्रेसचे माजी आमदार कन्हैयालाल गिडवाणी, त्यांचा मुलगा कैलास आणि दोन वकीलांना सीबीआयने अटक केली आहे.

Mar 7, 2012, 04:55 PM IST

आदर्शमधील बहुतांश फ्लॅट बेनामी

आदर्श सोसायटीमधील १०४ फ्लॅट्सच्या मालकांपैकी बहुतांश बोगस असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. फ्लॅट्सच्य़ा मालकीबाबत सीबीआयनं दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती देण्यात आली आहे.

Feb 28, 2012, 01:44 PM IST

आदर्श बिल्डिंग पाडण्याच्या निर्णय लांबणीवर

मुंबईतील वादग्रस्त आदर्श बिल्डिंग पाडण्याच्या केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचा निर्णय लांबणीवर पडला. आदर्श सोसायटीचं म्हणणं ऐकून न घेताच हा निर्णय झाल्यानं अतिरीक्त सॉलीसिटर जनरल खंबाटा यांनी आक्षेप घेतला.

Nov 19, 2011, 10:50 AM IST