खार सबवे मृत्युचा सापळा

पश्चिम रेल्वे आणि महापालिकेच्या वादात मुंबईतील खार सबवेच्या दुरुस्तीचं काम रखडलं होतं. नंतर हे अर्धवट काम करण्यात आलं.त्यामुळं अपघाताचा धोका निर्माण झाला.

Updated: Nov 29, 2011, 06:45 AM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

पश्चिम रेल्वे आणि महापालिकेच्या वादात मुंबईतील खार सबवेच्या दुरुस्तीचं काम रखडलं होतं. नंतर हे अर्धवट काम करण्यात आलं. त्यामुळं अपघाताचा धोका निर्माण झाला.

 

मुंबईच्या खार सबवेवरून रोज हजारो वाहन ये-जा करतात. शिवाय या सबवे वरुन  लोकल, एक्सप्रेस धावतात. पादचारी ही सबवे तुन जातात. मात्र या सगळ्यांनाच जीव मुठित धरुन या खार सबवेतुन जावं लागतं. कारण या सबवेच्या पुलाची दयनिय अवस्था झाली. स्लॅबला भेगा पडल्यात. सिमेंटींग व्यवस्थीत झालेलं नाही. तिथली फरशीही सलग नाही. वरुन लोकल गेली की खाली रस्त्यावर चालणाऱ्यांही हादरे जाणवतात.

 

खार सबवेच्या दुरुस्तीचा प्रश्न जुना आहे. पश्चिम रेल्वे आणि मुंबई महापालिकेतल्या वादामुळे ह्या सबवेच्या दुरुस्तीचं काम रखडलं होतं. काही महिन्यापुर्वी स्लॅबच्या प्लॅस्टरिंगच काम झालं. मात्र तेही अर्धवट. नव्यानं प्लॅस्टरींग करायला काही महिने लागतील असं रेल्वेचं म्हणण आहे. तो पर्य़त पुन्हा भिंतीचे पोपडे पडुन अपघात होण्याचा धोका आहे.