www.24taas.com, मुंबई
मुंबईतल्या युनायटेड मिलमध्ये गिरणी कामगारांनी घुसण्याचा प्रयत्न केलाय. पोलिसांनी सातशे आंदोलक गिरणी कामगारांना अटक केलीये. पण या गिरणी कामगारांनी जामीन नाकारलाय आणि ठिय्या आंदोलन सुरू केलंय.
डास निर्मुलनासाठी गिरण्या पाडा अशी शिफारस मुंबई पालिका प्रशासनानं शिफारस केली होती. याचा निषेध म्हणून गिरणी कामगारांनी हे आंदोलन केलं.
सकाळीच मुंबईतील करी रोड परिसरातल्या युनायटेड गिरणीच्या गेटबाहेर गिरणी कामगार गोळा झाले. त्यांनी महापालिका आणि सरकारविरोधात घोषणा देत गिरणीच्या आवारात घुसण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी सातशे गिरणी कामगारांना ताब्यात घेतलंय. पण आचा गिरणी कामगारांनी ठिय्या आंदोलन सुरू केल्यानं पुन्हा हा प्रश्न चिघळणार आहे.