बिल़्डरांचे हस्तक एसीपीवर बदलीचा 'कंट्रोल'

मुंबईत बिल्डरच्या एजंटगिरीचा आरोप असलेल्या आणि झोपडपट्टीधारकांवर दबाव आणणाऱ्या एसीपी खराडेचं 'झी २४ तास'नं बिंग फोडल्यानंतर त्यांची कंट्रोल रूममध्ये बदली करण्यात आली आहे.

Updated: Jun 19, 2012, 04:49 PM IST

www.24taas.com, मुंबई

मुंबईत बिल्डरच्या एजंटगिरीचा आरोप असलेल्या आणि झोपडपट्टीधारकांवर दबाव आणणाऱ्या एसीपी खराडेचं 'झी २४ तास'नं बिंग फोडल्यानंतर त्यांची कंट्रोल रूममध्ये बदली करण्यात आली आहे.

विलेपार्ले पूर्व भागातील आंबेडकर नगर परिसरातील जागा बिल्डरला द्यावी यासाठी एजंट बनून सेटलमेंट करण्याचं काम खराडे करत होता. सध्या या भागातील झोपडपट्टीधारकांना झोपडीमागे ४० लाखांचं आमिष दाखवलं जातं.

जे झोपडपट्टीधारक जागा विकायला तयार नाही त्यांना दमदाटी केली जाते तसचं ज्यांच्या झोपड्या नव्यानं उभ्या राहिल्या आहेत त्यांना १० हजार रूपयांत रेशनकार्ड बनवून देण्याची जबाबदरीही एसीपी खराडेनं स्वीकारली होती. डीएनएचे रिपोर्टर राहुल गडपाले यांनी स्टींग ऑपरेशन करून हे प्रकरण उघडकीस आणल होतं.