www.24taas.com, मुंबई
मुंबई आणि राज्यातल्या सर्व शासकीय आणि सार्वजनिक इमारतींचे पुढील तीन महिन्यांत फायर सेफ्टी ऑडीट करण्याच्या सूचना नगरविकास विभागानं दिल्या आहेत. येत्या तीन महिन्यात या सर्व इमारतींचे फायर सेफ्टी ऑडिट करणं बंधनकारक असणार आहे.
शासकीय इमारतींमध्ये राज्य सरकारची राज्यभरातली कार्यालयं, रुग्णालयं, निमशासकीय कार्यालयं, महापालिकांची कार्यालयं, रेल्वेस्थानकांची कार्यालयांचा समावेश आहे. तर सार्वजनिक इमारतींमध्ये शॉपिंग सेंटर्स, मॉल्स, मल्टीप्लेक्स, थिएटर्सचा समावेश आहे. या इमारतीतील फायर ऑडिट प्रमाणित फायर सेफ्टी एजन्सीजकडून पुढील तीन महिन्यात करून घ्यायचे आहेत.
हे फायर ऑडिट होतंय की नाही याची तपासणी करण्याची जबाबदारी काही अधिका-यांवर सोपवण्यात आली आहे. मंत्रालयाला लागलेल्या आगीनंतर उशिरा का होई ना अग्निसुरक्षेची किंमत सरकारच्या लक्षात आल्यामुळे भविष्यात तरी मोठ्या दुर्घटना टळतील, अशी आशा करायला हरकत नाही.