मुख्यमंत्र्यांनी घेतली नाराज आमदारांची भेट

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधात काँग्रेसच्याच काही आमदारांनी आघाडी उघडताच सावध झालेल्या मुख्यमंत्र्यांनी आज नाराज आमदारांना भेटीला बोलावून चौकशी केली. त्यांच्या मतदारसंघातील कामांची चौकशी करून मुख्यमंत्र्यांनी आमदारांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला.

Updated: Mar 28, 2012, 07:10 PM IST

www.24taas.com, मुंबई

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधात काँग्रेसच्याच काही आमदारांनी आघाडी उघडताच सावध झालेल्या मुख्यमंत्र्यांनी आज नाराज आमदारांना भेटीला बोलावून चौकशी केली. त्यांच्या मतदारसंघातील कामांची चौकशी करून मुख्यमंत्र्यांनी आमदारांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटतात पण आम्हाला अपॉईंटमेंट देत नाहीत अशी तर्कार काही आमदारांनी केली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी नाराज आमदारांना वेळ देत त्यांच्याशी चर्चा केली. दिवेआगरच्या गणेश मूर्ती चोरीप्रकरणी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी काल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची भेट घेतली होती. विधिमंडळाचं कामकाज सुरु असल्यानं त्यांनी विधिमंडळात जाऊन त्यांची भेट घेतली होती.

महापालिका आणि झेडपी निवडणुकीत काँग्रेस पक्षाला फारसं यश मिळालं नाही. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस मात्र दिवसेंदिवस काँग्रेसवर कुरघोडी करून डिवचते आहे. अशावेळी नेतृत्वाबद्दल आमदारांमध्ये नाराजी आहे.  त्यामुळे मुख्यमंत्री हटाव मोहीमेनं पुन्हा उचल घेतली होती. कामं होत नसल्यानं संतप्त झालेल्या आमदारांनी गुप्त बैठक घेऊन मुख्यमंत्री हटाव मोहीम सक्रीय करण्याचं ठरवलं होतं. विदर्भातील काँग्रेसच्या १०-१२ आमदारांनी मुख्यमंत्री हटाव सुरु केली आहे.