मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने मॅगीवरील बंदी उठवल्याने नेस्लेला मोठा दिलासा मिळालाय. न्यायालयाच्या निकालानंतर नेस्लेचा शेअर चांगलाच वधारला.
न्यायालयाचा या निकालानंतर आता महाराष्ट्रात मॅगीवर बंदी असणार नाही. अपुऱ्या माहितीच्या आधारावर एफएसएसएआयचा बंदी आदेश न्यायालयाने अवैध ठरलवलाय. अन्न व औषध प्रशासन (एफडीए) मॅगीवर बंदी घालू शकत नाही, असे निकाल देताना उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
दरम्यान, नस्लेविरोधात सरकारनं ६४० कोटी रुपयांच्या भरपाईचा दावाही दाखल केला होता. त्यामुळे न्यायालयाच्या या निर्णयामुळे त्याचे काय होणार, याची चर्चा आहे. महाराष्ट्रातील अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) केलेल्या २० चाचण्यांपैकी पाच चाचण्यांत मॅगीमध्ये शिशाचे प्रमाण हे मर्यादेपेक्षा अधिक आढळले होते.त्यानंतर बंदी घालण्यात आली होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.