www.24taas.com, मुंबई
आता पाहू या शेअर बाजार खुला होतानाचं चित्र..मुंबई शेअरबाजाराचा सेन्सेक्स 16 हजार 119 अंशावर उघडलाय. त्यात 89 अंशांची वाढ झालीय. तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी 4 हजार880 अंशांवर खुला झालाय. त्यात 26 अंशांची वाढ झालीय. डॉलरच्या तुलनेत रुपया आज 54 पूर्णांक 39 अंशांवर उघडलाय. डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत 10 पैशांनी सुधारलेली दिसते. दिवसभरातल्या शेअर बाजाराच्या घडामोडी आम्ही आपल्याला देतच राहू..
मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स काल 16 हजार 95 अंशांवर खुला झाला, त्यात 235 अंशांची घट झाली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी आज 4 हजार 874 अंशांवर खुला झाला. त्यात 73 अंशांची घट झाली. डॉलरच्या तुलनेत रुपया आज 54 पूर्णांक 10 अंशावर उघडलाय. डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत शून्य पूर्णांक 12 अंशांनीघसरली. दिवसभरातल्या शेअरबाजारातल्या घडामोडी आम्ही आपल्याला देतच राहू..
डॉलरच्या तुलनेत काल रुपयाची निचांकी घसरण झाली होती. पण आज सकाळी बाजार उघडताना रुपयाची किंमत काहीशी सुधारलीय. रुपयाच्या निचांकी घसरणीमुळे काल शेअर बाजारही कोसळला होता. मात्र, आज सकाळी शेअर बाजार खुला होताना सकारात्मक बदल दिसून आला.