निवडणूक आली... ११२ प्रस्तावांना तात्काळ मंजुरी

मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीत यावेळीही प्रस्तावांचा उच्चांक नोंदवला गेलाय. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तब्बल ११२ प्रस्ताव संमतीसाठी स्थायी समितीत मांडण्यात आले. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jan 4, 2017, 07:55 AM IST
 निवडणूक आली... ११२ प्रस्तावांना तात्काळ मंजुरी title=

मुंबई : मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीत यावेळीही प्रस्तावांचा उच्चांक नोंदवला गेलाय. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तब्बल ११२ प्रस्ताव संमतीसाठी स्थायी समितीत मांडण्यात आले. 

मागच्या ९० मिनिटांत बैठकीत ९७ कामांचे दीड हजार कोटी रूपयांचे कामांचे प्रस्ताव पास झाले होते तर त्यापूर्वीच्या स्थायी समिती बैठकीत ४६ मिनिटात ७३ कामांचे ११०० कोटी रूपयांचे प्रस्ताव पास झाले होते

आजच्या बैठकीत प्रस्तावांच्या भाऊगर्दीत प्रशासनाने काही खोटे प्रस्ताव ऐनवेळी घुसवल्याचेही समोर येतयं. आताच पूर्ण झालेल्या नविन रस्त्यांची तसंच सध्या सुरू असलेल्या रस्त्यांच्या दुरूस्ती कामांची  पुन्हा नव्याने प्रस्ताव आणले होतेय यात ९ रस्ते दुरूस्तीसाठीचे म्हणजे ८० कोटींचे प्रस्ताव स्थायी समितीने फेटाळले. 

हा भोंगळ कारभार समोर येताच सर्वपक्षीय सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. काही दिवसांपूर्वीच रस्ते घोटाळा उघडकीस आल्यानंतरही रस्ते विभागाचा गैरकारभार सुरूच आहे.  

स्थायी समितीच्या आजच्या बैठकीत खोटे प्रस्ताव आणलेल्या प्रकरणाची चौकशीचे स्थायी समिती अध्यक्षांचे आदेश दिले आहेत.