१६ वर्षाच्या मुलीची ८० हजारात विक्री

एका १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला ८० हजारांमध्ये विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या २ महिलांना चेंबूरच्या आरसीएफ पोलिसांनी अटक केली आहे.

Updated: May 29, 2013, 02:15 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
एका १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला ८० हजारांमध्ये विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या २ महिलांना चेंबूरच्या आरसीएफ पोलिसांनी अटक केली आहे. निलम आणि प्रिया अशी त्यांची नावे असून बारगर्ल म्हणून त्या काम करतात. तक्रारदार गुलाम शेखनं या दोघींजवळ अल्पवयीन मुलगी विकत घेण्याची इच्छा दर्शवली होती.
चेंबूरच्या एका ह़ॉटेलमध्ये आरोपी महिला या मुलीला घेऊन व्यवहार पूर्ण करण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी तक्रारदार गुलाम शेखनं यासंदर्भातील माहिती पोलिसांना दिली आणि आरोपींना रंगेहाथ पकडून दिले. यावेळी आरोपींना एडव्हान्स म्हणून पाच हजारांची रक्कमही देण्यात आली. तसंच यासंदर्भातील सर्व व्यवहार तक्रारदारानं छुप्या कॅमेऱ्यात कैद केला आहे.
अल्पवयीन मुलीला मध्य प्रदेशातून विक्रीसाठी आणण्यात आलं होतं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपी प्रियाची ती भाची आहे. कोर्टाने दोन्ही आरोपी महिलांना ३० मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर अल्पवयीन मुलीस बालसुधारगृहात ठेवण्यात आलं आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.