२०१६ या नवीन वर्षात काय घडणार?

इंग्रजी या नव वर्षाचे स्वागत करण्यासाठी तरुणाईसह सर्वजण उत्सुक आहेत. मात्र, २०१६ या नवीन वर्षात काय घडणार आहे, याची तुम्हाला माहिती आहे का?

Updated: Jan 3, 2016, 04:18 PM IST
२०१६ या नवीन वर्षात काय घडणार? title=

मुंबई : इंग्रजी या नव वर्षाचे स्वागत करण्यासाठी तरुणाईसह सर्वजण उत्सुक आहेत. मात्र, २०१६ या नवीन वर्षात काय घडणार आहे, याची तुम्हाला माहिती आहे का?

अधिक वाचा : पाहा २०१६ मधील सुट्या, सात सुट्या सोमवारी
 
आपण नवीन वर्षाचे अनेक संकल्प करतो. सकाळी लवकर उठण्याचा. व्यायाम करायचा. सकाळी न चुकता जॉगिंगला जायचे, आदींचा यात समावेश असतो. त्यातील बरेच संकल्प हे वर्षाच्या पहिल्याच दिवशी बोंबलतात, ही गोष्ट वेगळी. या नव्या २०१६मध्ये नेमके ठेवले तरी काय आहे? याविषयी पंचांगकर्ते खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितल्यापैकी…

– मार्च, एप्रिल, ऑगस्ट, ऑक्टोबर महिन्यात सलग चार दिवस सुट्ट्या आल्या आहेत. तसेच सहा सुट्ट्या रविवारला जोडून येत आहेत.

– नवीन वर्षी गणेशाचे आगमन दहा दिवस अगोदर म्हणजेच ५ सप्टेंबर रोजी होत आहे. गौरीबरोबर विसर्जन होणार्‍या गणपतींचा मुक्काम सहा दिवसांचा असणार आहे.

– २०१६मध्ये १४ एप्रिल, १२ मे, ९ जून असे तीन दिवस गुरुपुष्यामृत योग सुवर्ण खरेदीसाठी येत आहेत.

– संकष्ट चतुर्थी मंगळवारी न आल्याने नवीन वर्षामध्ये एकही अंगारकी चतुर्थी येत नाही.

खगोलीय घटना :
- बुधवार, ९ मार्च रोजी होणारे खंडग्रास सूर्यग्रहण पूर्व भारतातून दिसणार आहे. मुंबई, पुण्यातून दिसणार नाही. 

– बुधवार, २३ मार्च रोजी होणारे छायाकल्प चंद्रग्रहण रात्री ७.२५ पूर्वी चंद्रोदय होईल तेथून दिसेल. 

– बुधाचे अधिक्रमण – नवीन वर्षी बुधचे अधिक्रमण भारतातून दिसणार आहे. सोमवार ९ मे रोजी सायंकाळी ४.४४ वाजता बुध ग्रह सूर्यबिंबावर येईल. तो सूर्यबिंबावरून बाहेर पडण्यापूर्वीच सायंकाळी ७.०३ वाजता सूर्यास्त होईल. 

– यानंतर ११ नोव्हेंबर २०१९ रोजी बुधचे अधिक्रमण होईल. – १८ ऑगस्ट रोजी होणारे छायाकल्प चंद्रग्रहण आणि १ सप्टेंबर रोजी होणारे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही. – १८ सप्टेंबर रोजी होणारे छायाकल्प चंद्रग्रहण भारतातून दिसणार आहे.

विवाह मुहूर्त : 
– २०१६ या नवीन वर्षी जानेवारी, फेब्रुवारी , मार्च, एप्रिल, जुलै, नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात विवाह मुहूर्त आहेत. १ मे रोजी मुहूर्त आहे. त्यानंतर शुक्र अस्त असल्याने उर्वरित मे- जूनमध्ये मुहूर्त नाहीत.