मुंबई : मुंबई आणि उपनगरांत जोरदार पाऊस सुरू आहे. मुंबईत गेल्या 24 तासांत ६०. ०२ मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. तर उपनगरात ९४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
ठाणे, कल्याण परिसरातही सकाळपासून पावसाचा जोर कायम आहे. जोरदार पावसामुळं काही ठिकाणी रस्ते वाहतुकीवर परिणाम झालाय.
श्रावण आणि पाऊस सेलिब्रेशन करण्यासाठी मुंबईकरांनी समुद्रकिना-यावर गर्दी केलीय. मात्र समुद्रकिना-यावर हे सेलिब्रेशन करताना काळजी घ्या.
कोकणातही श्रावणाच्या आगमनाबरोबर पावसानं दमदार हजेरी लावलीय. रत्नागिरी जिल्ह्यात सरासरी ६४.५५ मिलिमीटर पावसाची नोंद झालीय.
रत्नागिरी सिंधुदुर्गातही समाधानकारक पाऊस झाल्याने शेतीची कामं ८० टक्के पूर्ण झालीयत. तर विदर्भामध्येही मुसळधार पाऊस सुरू आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.