लोकलमध्ये ‘दीदीगिरी’ करणाऱ्या महिलांना चाप

मुंबईच्या लोकल डब्यांमध्ये महिला ग्रुपच्या चालणाऱ्या दादागिरीविरोधात एका तरुणीनं आवाज तर उठवलाच शिवाय त्यांना न्यायालयात खेचून धडा शिकवला. बरखा मेघानी असं या तरुणीचं नाव असून ती उल्हासनगरची रहिवासी आहे.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Oct 31, 2013, 02:52 PM IST

www.24taas.com , झी मीडिया, मुंबई
मुंबईच्या लोकल डब्यांमध्ये महिला ग्रुपच्या चालणाऱ्या दादागिरीविरोधात एका तरुणीनं आवाज तर उठवलाच शिवाय त्यांना न्यायालयात खेचून धडा शिकवला. बरखा मेघानी असं या तरुणीचं नाव असून ती उल्हासनगरची रहिवासी आहे.
अंबरनाथ स्टेशनवरुन रोज सकाळी ७ वाजून ४८ मिनिटांनी सुटणाऱ्या लोकलमधल्या मिडल फर्स्ट क्लासच्या डब्यात सात महिलांचा एक ग्रुप आहे. जो बरखाला बसण्याच्या जागेवरुन रोज त्रास देत असे. महिनाभर हा त्रास सहन केल्यानंतर बरखानं अखेर रेल्वे पोलिसांत तक्रार केली.
या तक्रारीची दखल घेत रेल्वे पोलिसांनी सात महिलांना अटक करुन कोर्टासमोर हजर केलं. कोर्टानं या सात महिलांना प्रत्येकी एका हजारांचा दंड ठोठावून दिवसभर पोलीस ठाण्यात थांबवून ठेवलं.

पुरुषांच्या डब्यात होणारी रोजची दादागिरी आता महिलांच्या डब्यातही होत असल्याचं यानिमित्तानं उघडकीस आलीय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.