लालबागच्या राजाला सात किलो सोनं, 101 किलो चांदी, सहा कोटी रुपयांचं दान

मुंबईतील प्रसिद्ध गणपती लालबागच्या राजाचा दर्शनाला दरवर्षी लाखो भाविक येतात. अनेक जण आपला नवस पूर्ण झाला म्हणून बाप्पाच्या चरणी सोनं, चांदी, पैसा दान करतात.  

Updated: Oct 1, 2015, 12:46 PM IST
लालबागच्या राजाला सात किलो सोनं, 101 किलो चांदी, सहा कोटी रुपयांचं दान  title=

मुंबई: मुंबईतील प्रसिद्ध गणपती लालबागच्या राजाचा दर्शनाला दरवर्षी लाखो भाविक येतात. अनेक जण आपला नवस पूर्ण झाला म्हणून बाप्पाच्या चरणी सोनं, चांदी, पैसा दान करतात.  

आतापर्यंत आलेल्या दानामध्ये सात किलो सोनं, 101 किलो चांदी आणि सहा कोटी रुपयांचा समावेश आहे. ही मोजणी अजूनही सुरू आहे. त्यामुळं ही आकडेवारी आणखी वाढेल.

आणखी वाचा - लालबाग गणेशोत्सव मंडळाचा आडमुठेपणा कायम, दंड कधी भरणार?

गेल्यावर्षी लालबागच्या राजाच्या चरणी 5.3 किलो सोनं, 110 किलो चांदी आणि सात कोटी रुपये अर्पण करण्यात आले होते. 

'बँक ऑफ महाराष्ट्र'चे कर्मचारी आणि महानगर कोऑपरेटिव्ह बँकेचे कर्मचारी या रकमेची मोजणी करत आहेत. 

दुष्काळग्रस्तांना मदत करणार

यंदा दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे येण्याचं सर्व गणेश मंडळांना आवाहन करण्यात आलं होतं. अनेकांनी आपला मदतीचा हात शेतकऱ्यांसाठी आणि दुष्काळग्रस्तांसाठी पुढे केला. पण काय लालबागचा राजा मंडळ पुढे येईल? दरवर्षी कोट्यवधींची कमाई करणारं हे मंडळ यावर्षी तरी समाजासाठी काही करेल का? हा प्रश्न विचारला जातोय.

अभिनेता प्रशांत दामले आणि अक्षय कुमार यांची मदत

दरम्यान, दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी मराठी आणि बॉलिवूडचे कलाकार पुढे येत आहेत. अभिनेता प्रशांत दामले यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन दुष्काळग्रस्तांसाठी आपली मदत दिली.

 

तर अभिनेता अक्षय कुमार यानंही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. अक्षयनं यापूर्वीच शेतकऱ्यांना मदत केलीय. आता तो सरकारच्या 'जलयुक्त शिवार' योजनेसाठीही मदत करतोय. 

 

आणखी वाचा - नाना पाटेकर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना वाटणार ८० लाख रुपये

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.