मुंबई : अभिनेता आमिर खानने मोठ्या तोऱ्यात दिल्लीत असहिष्णेतवर पत्नीचा दाखला देत भाष्य केले. मात्र, त्याच्या वक्तव्यानंतर देशात संतापाची लाट पसरली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य करण्याचे टाळले. तर एमआयएमचे अध्यक्ष असादउद्दीन ओवेसी यांनी आमिरला टोला लगावला.
आमिर खानच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाळलंय. राज्यात अजून महत्त्वाचे बरेच मुद्दे आहेत, असं मुख्यमंत्री म्हणत या विषयावर भाष्य करण्याचे टाळले.
तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी आमिरच्या वादग्रस्त वक्तव्यावर थेट प्रतिक्रिया देणं टाळलंय. संतोष महाडिक यांच्या कुटुंबियांच्या भेटीला आलो आहे, तो विषय अधिक गंभीर असल्याचं त्यांनी नमूद केलं आणि ते पुढे निघून गेलेत.
दरम्यान, एमआयएमचे अध्यक्ष असादउद्दीन ओवेसी यांनी आमिरच्या वक्तव्याशी असहमती दर्शवलीय. भारत मुसलमानांचाही देश असून देश सोडून जाण्याचा प्रश्नच येत नसल्याचं त्यांनी नमूद केलंय. त्यामुळे त्यांनी आमिरला चपराक लगावली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.