मुंबईत १५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींचे गर्भपात ६७ टक्क्यांनी वाढले

 मुंबईत १५ वर्षांपेक्षा खालील मुलींच्या गर्भपाताचे प्रमाण झपाट्याने वाढते आहे. ही वाढ धक्कादायक आहे. सन २०१४-१५ मध्ये अल्पवयीन मुलींकडून करण्यात आलेल्या गर्भपाताचे प्रमाण ६७ टक्के वाढ झाली आहे. माहितीच्या अधिकारातून ही माहिती समोर आली आहे. 

Updated: May 14, 2015, 06:42 PM IST
मुंबईत १५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींचे गर्भपात ६७ टक्क्यांनी वाढले title=

मुंबई :  मुंबईत १५ वर्षांपेक्षा खालील मुलींच्या गर्भपाताचे प्रमाण झपाट्याने वाढते आहे. ही वाढ धक्कादायक आहे. सन २०१४-१५ मध्ये अल्पवयीन मुलींकडून करण्यात आलेल्या गर्भपाताचे प्रमाण ६७ टक्के वाढ झाली आहे. माहितीच्या अधिकारातून ही माहिती समोर आली आहे. 

यानुसार ३१ हजार महिलांनी गर्भपात केला. त्यात १६०० मुलीचे वय १९ वर्षांच्या खाली आहे. 

मुंबई महापालिकेच्या अंतर्गत असलेल्या शहरातील सर्व मान्यताप्राप्त मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नेंसी (एमटीपी) सेंटर मार्फत मिळालेल्या आकडेवारी नुसार २०१३-१४ वर्षात १५ वर्षांपेक्षा कमी असलेल्या १११ मुलींनी गर्भपात केला होता. तो आकडा २०१४-१५ पर्यंत वाढून १८५ वर पोहचला आहे. तर १५ ते १९ वर्षाँच्या तरूणींकडून गर्भपाताच्या प्रमाणातही गेल्या वर्षीच्या तुलनेत ४७ टक्के वाढ झाली आहे. विशेष म्हणजे अंधेरी इस्ट आणि वेस्ट यातील गर्भपात सेंटरमध्ये ६००० प्रकरणं समोर आली आहेत. 

या संदर्भात हेल्थ एक्सपर्टने सांगितले की, नको असलेल्या गर्भाचे प्रमाण वाढणे ही खतरनाक गोष्ट आहे. शाळा आणि कॉलेजमध्ये योग्य पद्धतीने सेक्स एज्युकेशन मिळत नसल्याने अशा प्रकारे गर्भधारणेचे प्रमाण वाढत आहे. तसेच अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण तसेच कमी वयात लग्न त्यामुळे गर्भधारणा होते. मग अशा वेळी गर्भपाताचे प्रमाणही वाढते. हे प्रमाण जी अधिकृत असले तरी अनधिकृत पद्धतीने प्रायव्हेट क्लिनिक्समध्ये तरुणी गोपनियतेमुळे गर्भपात करतात. 

२०१३-१४ या काळात केलेल्या विश्लेषणानुसार ३०००० तरूणींपैकी २३ हजारांनी गर्भनिरोधक वापरला तरीही त्या गर्भवती राहिल्याचे प्रकार घडले आहे. गर्भनिरोधक निष्फळ ठरल्याने गर्भ राहिल्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. अशा प्रकारे कमी वयात गर्भधारणा झाल्याने आई आणि मुलाचा जीव धोक्यात जातो तर मूल हे असमान्य जन्माला येऊ शकते. यातील केवळ १० प्रकरणात मुलींवर बलात्कार झाल्यामुळे त्या गर्भवती झाल्या आहेत. 

तज्ज्ञांनुसार या सर्व गोष्टी आपण लपवून ठेवण्यापेक्षा त्यावर प्रकाश टाकणे गरजेचे आहे. तसेच अल्पवयीन मुलींपर्यंत या गोष्टी पोहचविण्याची गरज आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.