बकरी ईददरम्यान भाजी विक्रीवर बंदी घालणार का, ओवेसींचा सवाल

मुंबईत सध्या मांसविक्रीबंदीवरून वाद सुरू झालाय. जैन धर्मियांच्या पर्युषणादरम्यान मीरा-भाईंदर महापालिकेनं मांसविक्रीवर बंदी घातलीय. तर बीएमसीनं ४ दिवस कत्तलखाना बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. यावर असदुद्दीन ओवेसी यांनी टीका केलीय. 

Updated: Sep 9, 2015, 10:14 AM IST
बकरी ईददरम्यान भाजी विक्रीवर बंदी घालणार का, ओवेसींचा सवाल title=

मुंबई: मुंबईत सध्या मांसविक्रीबंदीवरून वाद सुरू झालाय. जैन धर्मियांच्या पर्युषणादरम्यान मीरा-भाईंदर महापालिकेनं मांसविक्रीवर बंदी घातलीय. तर बीएमसीनं ४ दिवस कत्तलखाना बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. यावर असदुद्दीन ओवेसी यांनी टीका केलीय. 

आणखी वाचा - #meatban वर भडकले TWITTER यूजर्स, मुंबईला म्हटलं Ban-istan

हा निर्णय मुर्खपणाचा असून मग बकरी ईद दरम्यान भाजीविक्रीवर बंदी घालणार का? असा खोचक सवाल असदुद्दीन ओवेसी यांनी भाजपाला विचारला आहे. मुख्यमंत्र्यांनी महापालिकेचा निर्णय फेटाळून लावावा अशी मागणीही त्यांनी केली आहे. 

आणखी वाचा - 'कुराण सांगतं बीफ खाल्ल्यानं होतात अनेक आजार', गुजरात सरकारची जाहिरात

महापालिकेच्या निर्णयाविरोधात भाजपावर टीकेची झोड उठली असून शिवसेना, मनसे या पक्षांनीही या निर्णयाचा विरोध केला आहे. या वादात उडी घेत ओवेसी म्हणाले, धर्म एवढा महत्त्वाचा असेल तर बकरी ईददरम्यान मटण वाटलं पाहिजे आणि भाजीविक्रीवर बंदी टाकायला हवी, हे तुम्हाला सहन होईल का असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. मुंबई ही आर्थिक राजधानी असून अशा शहरात मांसविक्रीच्या व्यवसायावर बंदी घालणं योग्य नाही. हा फक्त मुस्लिमांचा विषय नसून याला आर्थिक दृष्टीकोनातून बघितलं पाहिजे. मांसविक्रीवर अवलंबून असलेले कामगार या कालावधीत उदारनिर्वाह कसा करणार असा प्रश्न त्यांनी सत्ताधाऱ्यांना विचारला. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.