अजित पवार पुन्हा अडचणीत, अण्णाभाऊ साठे महामंडळात घोटाळा?

अण्णाभाऊ साठे महामंडळात राष्ट्रवादी काँग्रेसनं मोठा घोटाळा केलाय. यामध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ४० आमदार असल्याचा आरोप भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी केलाय.

Updated: Apr 15, 2016, 03:17 PM IST
अजित पवार पुन्हा अडचणीत, अण्णाभाऊ साठे महामंडळात घोटाळा? title=

मुंबई : अण्णाभाऊ साठे महामंडळात राष्ट्रवादी काँग्रेसनं मोठा घोटाळा केलाय. यामध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ४० आमदार असल्याचा आरोप भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी केलाय.

लाभार्थ्यांची यादीच जाहीर

अण्णाभाऊ साठे महामंडळात राष्ट्रवादी काँग्रेसनं मोठा घोटाळा केल्याचा आरोप करणारे खासदार किरीट सोमय्या यांनी आज लाभार्थ्यांची यादीच जाहीर केली. त्यांनी ६४ बेनामी आणि ख-या लाभार्थी नेत्यांची यादीच जाहीर केली.

यात माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांसह ४० आमदारांचा समावेश आहे. राष्ट्रवादी नेत्यांनी शिफारस करुन पैशांचा दुरुपयोग केल्याचा तसंच महामंडळाचा पैसा निवडणुकीसाठी वापरल्याचा आरोप सोमय्या यांनी केलाय.  

घोटाळ्याचे आरोप बिनबुडाचे

दरम्यान, सोमय्यांनी केलेल्या घोटाळ्याचे आरोप बिनबुडाचे असून सखोल चौकशीची करा, असं आव्हान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिलेय. तसेच आरोप सिद्ध झालेत तर राजकारण सोडून देईन, असे म्हटले.