मुंबई : महापौर पदावर निवड होण्यापूर्वीच शिवसेनेचे महापौरपदाचे उमेदवार विश्वनाथ महाडेश्वर अडचणीत सापडले आहेत.
विश्वनाथ महाडेश्वर राहात असलेल्या साईप्रसाद गृहानिर्माण संस्था या इमारतीतील घर नियमबाह्य पद्धतीने विकत घेतल्याचा आरोप त्यांच्यावर होतोय.
ज्या वॉर्डातून महाडेश्वर निवडून आलेत त्याच वॉर्डातून निवडणूक लढलेले अपक्ष उमेदवार महेंद्र पवार यांनी हा आरोप केलाय.
महाडेश्वर यांनी नियमांचा भंग करून महापालिकेच्या तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या वसाहतीमधील सदनिका विकत घेतल्याचा आरोप त्यांच्यावर होतोय.
अपक्ष महेंद्र पवार यांनी याविरोधात तक्रार दाखल केली होती. उच्च न्यायालयाने हे प्रकरण लघूवाद न्यायालयात दाखल करण्यास सांगितलं असून तिथे येत्या 23 तारखेला सुनावणी होणार आहे.
किमान तोवर महाडेश्वर यांना महापौर बनवू नये अशी मागणी पवार यांनी केलीय.