मुंबई : नवी मुंबईच्या एपीएमसीमध्ये हापूस आंब्याचे भाव गडगडले आहेत.
गेल्या वर्षीच्या तुलनेत बाजारात हापूसची दुप्पटीने आवक झालीय. महाराष्ट्र आणि कर्नाटकातून हापूसच्या सुमारे 53 हजार पेट्या दाखल झाल्यात.
गुढीपाडव्याआधी एवढ्या मोठ्या प्रमाणात आंब्याची कधीही आवक झाली नव्हती... गेल्या वर्षीच्या तुलनेत आंबा लवकर दाखल झाला असला तरी यंदा आंब्याला कमी भाव मिळत असल्याचे चित्र आहे.
गेल्या वर्षी हापूस आंब्याच्या पेटीला पाच हजाराचा भाव मिळत होता. तोच आता तीन हजारावर आलाय. ग्राहक नसल्याने हापूसचे भाव गडगडल्याचे आंबा व्यापाऱ्यांनी म्हटलंय.
बाजारात ग्राहक नसल्याने व्यापारी आता आंबा निर्यात करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. आखाती देश, न्यूझीलंड, दक्षिण कोरिया, मलेशिया, ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये आंबा पाठवण्यात येतोय.