नगरसेवकाची ह्त्या : अरूण गवळी दोषी

शिवसेनेचे माजी नगरसेवक जामसंडेकरांच्या हत्येप्रकरणी अरुण गवळीसह १२ जण दोषी असल्याचे मोक्का न्यायालयाने शिक्कार्मोतब केले आहे. राजकीय वादातून हत्या झाल्याचे स्पष्ट झाले होते.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Aug 24, 2012, 01:42 PM IST

www.24taas.com,मुंबई
शिवसेनेचे माजी नगरसेवक जामसंडेकरांच्या हत्येप्रकरणी अरुण गवळीसह १२ जण दोषी असल्याचे मोक्का न्यायालयाने शिक्कार्मोतब केले आहे. राजकीय वादातून हत्या झाल्याचे स्पष्ट झाले होते.
मुंबईतले माजी नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्ररणी अरुण गवळीला दोषी ठरवण्यात आले आहे. मोक्का कोर्टाने हा निर्णय दिला. या प्रकरणात १६ आरोपींपैकी १२ जणांना दोषी ठरवण्यात आलंय तर तीन आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलीय. एका आरोपीचा मृत्यू झालाय.
महापालिकेच्या निवडणुकीत अजित राणेचा पराभव झाला होता. त्यामुळे जामसांडेकर यांच्या हत्येची गवळीला सुपारी देण्यात आली होती.