मुंबईतल्या सात रेल्वे स्टेशनची नावे बदलण्याची सेनेची मागणी

मुंबईतल्या सात रेल्वे स्टेशनची नाव बदलण्याची मागणी शिवसेनेनी केलीय. पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावरील सात स्टेशनची नाव बदलण्याची मागणी  करण्यात आलीय. 

Updated: Mar 18, 2017, 07:06 PM IST
मुंबईतल्या सात रेल्वे स्टेशनची नावे बदलण्याची सेनेची मागणी title=

मुंबई : मुंबईतल्या सात रेल्वे स्टेशनची नाव बदलण्याची मागणी शिवसेनेनी केलीय. पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावरील सात स्टेशनची नाव बदलण्याची मागणी  करण्यात आलीय. 

शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी हि मागणी लोकसभेत केलीय. पश्चिम मार्गावरील एलफिन्स्टन स्टेशनचं नाव प्रभादेवी करावं, मुंबई सेंट्रलला नाना शंकर शेठ, चर्नी रोडला गिरगाव नाव देण्याची मागणी केलीय. 

मध्य रेल्वेवरील करीरोडला लालबाग, सँडर्हस्ट स्टेशनला डोंगरी नाव देण्याची मागणी केलीय. तर हार्बर रोडवरील कॉटन ग्रीनला काळाचौकी, रे रोडला घोडपदेव स्टेशन नाव देण्याची मागणी शिवसेनेने केलीय.