राज ठाकरेंनी पूर्ण वेळ कार्टुनच काढत बसावं, शेलारांचा टोला

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी काढलेल्या कार्टूनवर भाजप नेत्यांकडून टीका सुरु झालीय.. हे कार्टून म्हणजे राज यांचा पुन्हा चर्चेत येण्याचा प्रयत्न असल्याची टीका मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी केलीय.. आता राज यांनी पूर्णवेळ कार्टूनिस्ट व्हावं असा हल्लाबोल शेलार यांनी केलाय. 

Updated: Feb 13, 2015, 12:36 PM IST
राज ठाकरेंनी पूर्ण वेळ कार्टुनच काढत बसावं, शेलारांचा टोला title=

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी काढलेल्या कार्टूनवर भाजप नेत्यांकडून टीका सुरु झालीय.. हे कार्टून म्हणजे राज यांचा पुन्हा चर्चेत येण्याचा प्रयत्न असल्याची टीका मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी केलीय.. आता राज यांनी पूर्णवेळ कार्टूनिस्ट व्हावं असा हल्लाबोल शेलार यांनी केलाय. 

पाहुयात, आशिष शेलार यांनी काय ट्विट केलं... 

  
  
 दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीही ठाकरे बंधूंवर टीका केलीय. 'उद्धव ठाकरे ज्या भाषेत बोलतात त्या भाषेत आम्ही बोलू शकत नाही, कारण आम्ही शिस्तप्रिय आहोत' असा टोला त्यांनी लगावलाय... तर राज ठाकरेंनी रेखाटलेल्या कार्टूनवरही टीका केलीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.