बाप्पा मोरया, गणेशोत्सवाला सुरुवात

गणेशोत्सवाला आजपासून सुरुवात झाली. सकाळपासूनच भाविकांनी आपल्या लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी गर्दी केली. बाप्पाचे आगमन वाजत गाजत होत आहे.

Updated: Sep 17, 2015, 12:37 PM IST
बाप्पा मोरया, गणेशोत्सवाला सुरुवात  title=

मुंबई : गणेशोत्सवाला आजपासून सुरुवात झाली. सकाळपासूनच भाविकांनी आपल्या लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी गर्दी केली. बाप्पाचे आगमन वाजत गाजत होत आहे.

गणेश गल्लीच्या मुंबईच्या राजाचे यंदा ८८ वे वर्ष आहे. मुंबईच्या राजासाठी यंदा गणेश गल्ली मंडळाने थेट गुजरातच्या सारंगपूर येथील हनुमानाच्या भव्य दिव्य मेदिराची प्रतिकृती साकारली आहे. तसंच याठिकाणी दुष्काळ ग्रस्तांसाठी मदतीचं आवाहनही केले जाते आहे. 

मुंबईचा राजा अशी ख्याती असलेल्या गणेश गल्लीत यंदा बाप्पाचे हेरंब रुप पाहायला मिळतंय. २२ फुटांची ही भली मोठी मूर्ती पाहण्यासाठी भाविकांची पहाटेपासून गर्दी आहे. तसेच लालबागचा राजाचे आगमन ही झालेय. सकाळी आरतीही करण्यात आली.

तर दुसरीकडे पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची प्रतिष्ठापना भक्तिमय वातावरणात करण्यात आली. सकाळी साडेआठच्या सुमारास दगडूशेठ मंदिरापासून श्रींच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. फुलांच्या रात असलेली श्रींची मूर्ती ढोल ताश पथकं झांज पथकांचा गजक आणि साथीला प्रभात बँड अशा थाटात सभामंडपांत आणण्यात आली. मंडळाने यंदा गणेशस्वानंदमहल या देखाव्याची निर्मिती केली आहे. 

अहमदनगर शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्रीविशाल गणपतीची प्रतिष्ठापणा आज मोठ्या उत्साहात करण्यात आली. परंपरेनुसार नव्यानेच बदलून आलेल्या पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणावर ढोल - ताशांचे पथक गणेश मंदिराच्या परिसरात तैनात करण्यात आले होते. याच ढोल ताशांच्या गजरात या विशाल गणेशाची प्रतिष्ठापणा करण्यात आली. गणेशोत्सवाच्या निमित्ताने ट्रस्टच्यावतीने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

कोकणात गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळतेय. कोकणातल्या रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यात बापांच वाजत गाजत आगमन झाले आहे. रत्नागिरीच्या कर्ला आणि आंबेशेत या गावातील ग्रामस्थानी गणरायाच आगमन धूम धडाक्यात केल.. गेली ३० वर्ष या गावातील घरगुती गणेशांची मिरवणूक एकत्रित काढली जाते. १९८६पासून सुरु झालेली ही परंपरा आजही सुरु आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.