मुंबई : राज्यातल्या भाजपा आमदारांना आता विधीमंडळात दर तासाला हजेरी द्यावी लागणार आहे.
सध्या फडणवीस सरकारची विरोधकांच्या आंदोलनामुळे आणि शिवसेनेच्या अंतर्गत विरोधामुळे कोंडी झालीय. त्यामुळे भाजपा आमदारांची विधानसभा आणि विधान परिषदेत पक्षाची चांगली संख्या रहावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय.
भाजपाचे विधानसभेत १२२ तर विधान परिषदेत १२ आमदार आहेत. पक्षाच्या आमदारांसाठी एक हजेरी पुस्तकच तयार करण्यात आलंय. सकाळी ११ ते संध्याकाळी ६ या वेळेत दर तासाला त्या हजेरी पुस्तकात आमदारांना सही करावी लागणार आहे.
केंद्रात भाजपाच्या खासदारांना अशाच प्रकारे दर तासाला हजेरी द्यावी लागते. तोच कित्ता आता महाराष्ट्रातही गिरवला जाणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.