मुंबई: मुंबईत एक धक्कादायक घटना पुढे आलीय. एका महिलेनं आपल्या पुतण्यासोबत शारीरिक संबंध बनविण्याचा प्रयत्न केला. पुतण्यानं नकार दिला तर तिनं त्याचा प्रायव्हेट पार्टवर ब्लेडनं वार केला. नंतर चाकूनं त्याच्यावर वार केले. पोलिसांनी महिलेला अटक केलीय.
पोलिसांनी सांगितलं, व्यवसायानं सुतार असलेल्या मुंबईतील नालासोपारा भागात राहणाऱ्या ३० वर्षीय जितेंद्र विश्वकर्मा या तरुणावर २८ वर्षीय महिलेनं जी नात्यानं त्याची काकू आहे, त्याच्यावर हल्ला केला. तुळिंज पोलीस स्टेशनचे एसआय सुनील जाधव यांनी सांगितलं की, जितेंद्र विवाहित आहे आणि त्याला दोन मुलंही आहेत. गेल्यावर्षी आक्टोबर महिन्यात एका कामानिमित्त तो भोपाळला गेला होता. तेव्हा त्याची ओळख आपल्या नात्यातील काकू रीना विश्वकर्मासोबत झाली. रीनानं तीन महिन्यांपर्यंत जितेंद्र सोबत अनैतिक संबंध होते. या संबंधाचा संशय त्याच्या पत्नीला आला आणि तिनं जितेंद्रला मुंबईत बोलवलं.
आणखी वाचा - 'किस ऑफ लव्ह'फेम राहुल-रश्मीचा 'सेक्स रॅकेट' प्रकरणाशी नेमका संबंध काय?
मुंबईत परतल्यानंतर जितेंद्रनं रीनासोबत कोणताही संपर्क ठेवला नाही. मग अचानक सप्टेंबर महिन्यात रीना भोपाळहून मुंबईत आली आणि आपल्या नवऱ्याला सोडून आल्याचं तिनं जितेंद्रला सांगितलं. ती त्यांच्यासोबत राहू लागली. जितेंद्रनं आपल्या पत्नीची समजूत काढली आणि रीनाला आपल्याच घरी ठेवलं. त्यानंतर दोघांमध्ये पुन्हा शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. रविवारी जितेंद्रनं रीनाला शारीरिक संबंधांसाठी नकार दिला. तेव्हा रागाच्या भरात तिनं ब्लेडनं जितेंद्रच्या प्रायव्हेट पार्टवर वार केलेत. आता जितेंद्रवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत आणि रीनाला अटक झालीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.