मुंबई : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांच आयोजन करण्यात आलंय. बाळासाहेबांच्या जयंती निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विविध लोकोपयोगी योजनांचा शुभारंभ करण्यात येणार आहे.
सकाळी साडेनऊ वाजता हा सोहळा मुंबई सेंट्रल येथील महामंडळाच्या आगारात आयोजीत करण्यात आलाय. यावेळी बाळासाहेबांच्या नावे पाच योजना जाहीर करण्यात येणार आहेत. दरम्यान बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त सकाळपासूनच शिवसैनिक स्मृतीस्थळी अभिवादनासाठी शिवाजी पार्क येथे जमू लागलेत..
शिवसेनाप्रमुख बाबासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त तोट्यात असलेल्या एसटी महामंडळाचा भपकेबाज कार्यक्रम मुंबई सेंट्रलवर आयोजित करण्यात आलाय. विशेष म्हणजे संपूर्ण स्थानक बंद करून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. त्यामुळं पहिल्यांदाच मुंबई सेंट्रल बस स्थानक बंद करून दाखवण्याचा विक्रम शिवसेनेच्या परिवहन मंत्र्यांनी केलाय.
प्रवाशांना कोणतीही कल्पना न देता तयारीसाठी दुपारपासून अनेक गाड्यांची ये-जा बंद करण्यात आली. आज सकाळपासून मुंबई सेंट्रलमधून सुटणा-या गाड्या परेल आणि कुर्ला डेपोतून सुटणार आहेत. त्यामुळं प्रवाशांचे हाल होणार आहेत.