ओवेसींची गर्दन कायद्यानंच उडवायला हवी - उद्धव ठाकरे

मुंबई : 'आपल्या गळ्यावर कुणी चाकू लावला तरी भारतमाता की जय म्हणणार नाही, अशी बांग ओवेसीने ठोकली, खरं तर अशा लोकांच्या गळ्यास फक्त चाकू न लावता त्यांची गर्दनच कायद्याने उडवायला हवी' अशा शब्दांत शिवसेनेने असदुद्दीन ओवेसींवर घणाघाती टीका केली आहे. 

Updated: Mar 17, 2016, 11:11 AM IST
ओवेसींची गर्दन कायद्यानंच उडवायला हवी - उद्धव ठाकरे title=

मुंबई : 'आपल्या गळ्यावर कुणी चाकू लावला तरी भारतमाता की जय म्हणणार नाही, अशी बांग ओवेसीने ठोकली, खरं तर अशा लोकांच्या गळ्यास फक्त चाकू न लावता त्यांची गर्दनच कायद्याने उडवायला हवी' अशा शब्दांत शिवसेनेने असदुद्दीन ओवेसींवर घणाघाती टीका केली आहे. गुरुवारी सामनाच्या अग्रलेखातून ही टीका करण्यात आली आहे.

भारतमातेचा जय न म्हणणाऱ्यांचा मतदानाचा अधिकार काढून घेऊन त्यांचे नागरिकत्व रद्द करण्याची मागणीही या अग्रलेखाद्वारे करण्यात आली आहे. १४ मार्चला असदुद्दीन ओवेसी यांनी 'संविधानात कुठेही भारत माता की जय म्हणा असे म्हटले नसल्याने आपण ते म्हणणार नाही' अशा आशयाचे विधान केले होते.

त्यांच्या या वक्तव्यावर वादंग उठला होता. बुधवारी महाराष्ट्राच्या विधान सभेतही त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद उमटले. एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांचे सर्वपक्षीय ठरावानंतर निलंबनही करण्यात आले.

'भारतमातेच्या पाठीवर वार करून हे महाशय स्वत:ला हिंदुस्थानचे नागरिक म्हणवून घेत असतील तर त्यांच्या माथेफिरूपणावर कायदेशीर इलाज करणे गरजेचे आहे,' असेही या लेखात म्हटले आहे.

महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री असताना अशा प्रकारची वक्तव्ये कशी काय खपवून घेतली जातात? असा सवालही शिवसेनेने देवेंद्र फडणवीसांना केला आहे.

'भारतमातेच्या पाठीवर वार करून हे महाशय स्वत:ला हिंदुस्थानचे नागरिक म्हणवून घेत असतील तर त्यांच्या माथेफिरूपणावर कायदेशीर इलाज करणे गरजेचे आहे. त्यांना 'वंदे मातरम्' म्हणायचे नाही, कारण मातृभूमी ही संकल्पना इस्लामला मान्य नाही. त्यांना समान नागरी कायदा नकोच. कारण 'शरीयत' कायदा इस्लामचा प्राण आहे व आता भारतमाता की जयही म्हणायचे नसेल तर मग भारतमातेला भार बनून येथे का राहत आहात, हा प्रश्न विचारला तर तुमच्या दाढ्या जळू नयेत', असा वार पुढे या अग्रलेखातून करण्यात आला आहे.