'हिंदू'नंतर फक्त कविताच लिहिणार - भालचंद्र नेमाडे

 ज्येष्ठ साहित्यिक आणि 'कोसला'कार भालचंद्र नेमाडे 'हिंदू' कांदबरीनंतर केवळ कविता लेखन करणार असल्याची सर्वात मोठी घोषणा स्वतः नेमाडे यांनी झी २४ तासशी बोलताना सांगितले. 

Updated: Feb 6, 2015, 04:00 PM IST
'हिंदू'नंतर फक्त कविताच लिहिणार - भालचंद्र नेमाडे  title=

मुंबई :  ज्येष्ठ साहित्यिक आणि 'कोसला'कार भालचंद्र नेमाडे 'हिंदू' कांदबरीनंतर केवळ कविता लेखन करणार असल्याची सर्वात मोठी घोषणा स्वतः नेमाडे यांनी झी २४ तासशी बोलताना सांगितले. 

नेमाडे यांना साहित्यातील सर्वोच्च सन्मान ज्ञानपीठ घोषीत झाल्यानंतर ते झी २४ तासशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. 'हिंदू' चे तीन भाग लिहून तयार आहेत. ती पूर्ण झाल्यावर फक्त कविता लेखन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

साहित्यातील मानाचं पान मिळेल असे वाटलं होतं का? यावर बोलताना नेमाडे म्हणाले मला असा पुरस्कार मिळेल असे वाटले नव्हते. मी लोकांवर टीका करत आलो लोकांशी भांडत आलो, असं काही झालं तर आश्चर्यच वाटतं. 

मुलाखती का देत नाही? 
आत्ममग्नता ही लिखाणाची गरज आहे, मला वाटतं मी खूप कामात असतो. कधी मी एकटा होईल. कधी मी स्वतः पुरती राहिल याची मी वाटंच पाहत असतो. असा क्षण मिळाला तर मी त्या क्षणात घुसतो. असे अनेक दिवस मिळाले तर मी लिहू शकतो. मी नेहमी स्वतः पुरता राहणारा माणूस आहे. पण मी इतरांचा दुस्वासही करत नाही. सर्वांशी संपर्क राहावा असेही मला वाटत असतो त्यामुळे या दोन्ही गोष्टींचा समन्वय राहावा असे मला वाटतं. कायम आपआपल्या तंद्रीत चालत राहवं आणि काय.... 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.