कामगार संघटनांचा आज देशव्यापी संप

विविध कामगार संघटनांनी आज देशव्यापी संप पुकारला आहे. देशातील प्रमुख ११ कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी संपातून महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी महासंघाने यातून माघार घेतली आहे.

Updated: Sep 2, 2016, 08:00 AM IST
कामगार संघटनांचा आज देशव्यापी संप  title=

मुंबई : विविध कामगार संघटनांनी आज देशव्यापी संप पुकारला आहे. देशातील प्रमुख ११ कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी संपातून महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी महासंघाने यातून माघार घेतली आहे.

सातवा वेतन आयोग लागू करावा, रिक्त जागा भराव्यात, पाच दिवसांचा आठवडा करावा, कंत्राटी कामगारांना किमान 18 हजार वेतन द्यावं, निवृत्तीचं वय 60 वर्षं करावं अशा त्यांच्या काही प्रमुख मागण्या आहेत.

संपात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना, सरकारी-निमसरकारी कर्मचारी शिक्षक संघटना समन्वय समिती आदी सहभागी होणार आहेत.

यामुळे सरकारी कामकाज ठप्प होण्याची भिती असून संपात सहभागी कर्मचा-यांवर कारवाई करण्याचा इशारा सरकारने दिला आहे.