www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेलाही सार्वजनिक मंत्री छगन भुजबळांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राज यांनी भ्रष्टाचारी अधिका-यांचं अंकगणित मांडलं होतं. त्यावर भुजबळांनी गुंडगिरीचं समीकरण मांडत नाशिकमध्ये इतके गुंड तर मुंबईत किती आणि महाराष्ट्रात किती, असं म्हटलं आहे.
सतिश चिखलीकरच्या संपत्तीच्या सुरस कहाण्या ऐकल्यानंतर राज ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. आपल्या शैलीत तो मांडताना राज ठाकरे म्हणाले होते की, ‘आपल्याला शाळेतल्या गणितात प्रश्न असतात ना की, एक डझन आंब्यांना अमूक अमूक पैसे लागतात तर ... आंब्यांना किती पैसे... तसाच प्रश्न आहे की एका पीडब्लूडीच्या इंजिनिअरकडे एवढी संपत्ती असेल तर पीडब्लूडीच्या मंत्र्याकडे किती संपत्ती असेल?’
‘मी त्यामुळे कोणत्याही चिखलीकरला ओळखत नाही आणि चिखलीकरचा तपास करताना पोलिसांना जर डायरीच सापडलेली नसेल तर त्यात माझं नावं येईलच कसं? डायरी आणि त्यातील माझे नाव, म्हणजे माध्यमांची बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात आहे’ असं भुजबळांनी म्हटलं होतं.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.