भाजपाच्या प्रचाराचा आज नारळ फुटणार

मुंबईत भाजपाच्या प्रचाराचा आज नारळ फुटतोय... प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह मुंबईतले तमाम नेते, मंत्री दुपारी 2 वाजता हुतात्मा स्मारकावर जमतील. 

Updated: Feb 5, 2017, 12:17 PM IST
भाजपाच्या प्रचाराचा आज नारळ फुटणार title=

मुंबई : मुंबईत भाजपाच्या प्रचाराचा आज नारळ फुटतोय... प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह मुंबईतले तमाम नेते, मंत्री दुपारी 2 वाजता हुतात्मा स्मारकावर जमतील. 

तेथे संयुक्त महाराष्ट्रात हुतात्मे झालेल्यांना आदरांजली वाहून महापालिका निवडणुकीचा प्रचार सुरू होईल. त्यानंतर लगेचच वाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये भाजपाची शहरातली पहिली सभा होईल.

शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपा नेते काय टीका करणार, विकासाचं कोणतं स्वप्न मुंबईकरांना दाखवणार हे या सभेत स्पष्ट होईल.