मुंबई : भाजपच्या बड्या पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक होतेय. वर्षपूर्तीच्या निमित्तानं आयोजित या बैठकीत शिवसेनाविरोधात भाजपच्या संतापाचा उद्रेक होण्याची शक्यता आहे.
अधिक वाचा : 'गोध्रामुळे मोदींची जगभर ओळख निर्माण झाली' - शिवसेना
शिवसेना आणि भाजपमध्ये गेल्या काही दिवसात तणाव वाढतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमावर शिवसेनेनं एकप्रकारे अघोषित बहिष्कार टाकला होता. मोदींच्या स्वागताला महापौरही उपस्थित नव्हत्या. अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी यांचे निकटवर्तीय अशी ओळख असलेल्या सुधींद्र कुलकर्णींच्या तोंडाला शिवसैनिकांनी काळ फासलं. त्यामुळं दोन्ही पक्षांमधला तणाव आणखी वाढलाय.
अधिक वाचा : शिवसेनेची तलवार म्यान, सेना नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली नाराजी
शिवसेना जर भाजपच्या सर्वोच्च नेत्यांचा आणि पंतप्रधानांचा मान ठेवत नसेल तर त्यांनी युतीतून बाहेर पडावं असा सूर भाजपमधून उमटू लागलाय. शिवसेना युती तोडू शकते, या बातम्या येत असताना आता भाजप कार्यकर्ते हे सेनेने युती तोडली तर तोडू दे, अशा मनस्थितीमध्ये आलेत. या सगळ्या मुद्यांवर या बैठकीत खलबतं होण्याची चिन्हं आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.