मुंबई : शिवसेनेच्या वारंवार सरकारला अडचणीत आणण्याच्या डोकेदुखीला कायमच दूर करण्यासाठी भाजप कोअर टीममधील काही नेत्यांनी सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी बैठक घेतली
चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या मुख्यमंत्री समवेत बैठकीत भाजप नेत्यांनी चर्चा केली. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, विनोद तावडे, सुधीर मुनंगटीवार, गिरीश बापट, गिरीश महाजन, पंकजा मुंडे या सह काही नेते या बैठकीला उपस्थित होते.
काही नेत्यांची बैठकीत भूमिका घेतली, की सेने शिवाय अन्य पर्याय चाचपणी करावी. अन्यथा काँग्रेस एनसीपीतील संपर्कात असलेल्या आमदार सहकार्यातून पुढील वाटचाल करावी, काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील किमान ३० आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचे म्हटले जात आहे.
काँग्रेस १५, एनसीपी १४ काही आमदार संपर्कात असल्याचे दावा या बैठकीत काही भाजप नेत्यांनी केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे त्यांनी जर पक्षातून फुटून भाजपला पाठिंबा दिला तर त्यांचे आमदार पद कायद्यानुसार रद्द होईल आणि मग पोट निवडणुका करून त्यांना भाजपच्या तिकीटावर निवडून आणायचे असा विचार भाजपकडून करण्यात येत आहे.
अन्यथा मध्यावधी निवडणूकीला सामोरे जाण्याचा ही विचार करावा, त्यामुळे वारंवार सेनेची डोकेदुखी नको अशी भूमिका काही भाजप नेत्यांनी या बैठकीत मांडल्याचे समजते.
यासंदर्भात दिल्ली पक्ष नेत्यांशी म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याशी चर्चा करून निर्णय घ्यावा असा विचार ही या बैठकीत मांडल्याच समजते आहे.
- राज्यातील राजकीय अस्थिरता संरवण्यासाठी भाजपाच्या हालचाली
- विरोधी पक्षाचे २५ आमदार फोडण्याची भाजपाची रणनिती
- काॅंग्रेसचे १५ आणि राष्ट्रवादीचे १४ आमदार फोडण्याची तयारी
- शिवसेनेच्या विरोधाच्या भूमिकेमुळे भाजपाची खेळी
- मुख्यमंत्र्यांसह वरिष्ठ नेतांच्या बैठकीत झाली चर्चा
- आमदार फोडण्याऐवजी मध्यावधी निवडणुकीस सामोरं जाण्याचा काही नेत्यांचा आग्रह
- राज्यात आगामी काळात राजकीय भूकंप घडण्याची शक्यता