मुंबई : मार्डच्या संपाबाबत संभ्रम कायम असल्याचं समोर आलंय.
मुंबई हायकोर्टानं फटकारल्यानंतर संप मागे घेण्याची माहिती मार्डच्या अध्यक्षांनी कोर्टात दिली. तसंच लगेचच कामावर रुजू होणार असल्याचंही सांगितलं. तसंच मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीतही सकारात्मक चर्चा झाली. मात्र आता पुन्हा लेखी आश्वासनाशिवाय संप मागे घेणार नसल्याची भूमिका मार्डनं मांडलीय.
तसंच कोर्टाच्या निकालाची प्रत आल्यानंतर आयएमएच्या बैठकीत संप मागे घेण्याबाबत निर्णय जाहीर करणार असल्याचं 'मार्ड'नं स्पष्ट केलंय.
त्यामुळं निवासी डॉक्टरांनी नेमकं संप मागे घेतला की नाही? आणि ते कामाला नेमकं कधीपासून सुरूवात करणार? याबाबत संभ्रम कायम आहे.