मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीत भाजपाच्या विरोधात काम करण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतलाय.
पक्षानं याबाबत सूचना दिल्या आहेत. अमरावती, नाशिक पदवीधर मतदारसंघात भाजपाविरोधात शिवसेना मैदानात आहे. अन्य मतदारसंघांमध्ये भाजपा विरोधात इतर पक्षाच्या उमेदवारांना शिवसेना मदत करणार आहे.
नागपूर, कोकण, औरंगाबाद शिक्षक मतदारसंघातही शिवसेना भाजपाच्या विरोधात काम करणार आहे. तीन फेब्रुवारीला या निवडणुकीचं मतदान आहे.