मुंबईत मनसेला जोरदार झटका

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मुंबईत जोरदार धक्का बसलाय.

Updated: Jan 31, 2017, 11:13 AM IST
मुंबईत मनसेला जोरदार झटका title=

मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मुंबईत जोरदार धक्का बसलाय.

बोरिवलीतील मनसेचे नगरसेवक चेतन कदम शिवसेनेत प्रवेश कऱणार आहेत. दुपारी १२ वाजता मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कदम शिवसेनेत प्रवेश करणार आहे. 

चेतन कदम हे मनसेचे महापालिकेतील स्थायी सदस्य आहेत. चेतन कदम यांच्या रुपाने ऐन निवडणुकीत शिवसेनेच्या गळाला मोठा मासा लागल्याची चर्चा रंगलीये.