मुंबई : मुंबईत आता उघड्यावर शौचास बसणा-यांवर दंडात्मक कारवाई केली जाणाराय. हगणदारीमुक्त मुंबई करण्यासाठी बीएमसीनं प्रयत्न सुरु केले असून त्याच्याच प्रयत्नाचा हा एक भाग आहे.
कायद्यातील तरतुदीनुसार दोनशे रुपये पर्यंतचा दंड केला जाणाराय. यासंदर्भातील आदेश सर्व वॉर्ड ऑफिसरना अतिरिक्त महापालिका आयुक्त पल्लवी दराडे यांनी दिलेत.
बीएमसीनं मुबंईतल्या 15 लाख कुटुंबियांचा सर्व्हे केला असून टॉयलेट कमी असणा-या ठिकाणी कम्युनिटी टॉयलेट बांधली जाणारेत. यासाठी झोपडपट्ट्यांमध्ये जनजागृतीही केली जाणार असली तरी उघड्यावर शौचास जाणा-यांचे प्रमाण मुंबईत अधिक आहे. त्यामुळेच दंडाची कारवाई करून मुंबई हागणदारीमुक्त केली जाणाराय.
रेल्वे लाईनच्या बाजूला उघड्यावर शौचास बसण्याचे प्रमाण अधिक असल्यानं जवळच्या झोपडपट्ट्यांमध्ये याविषयी जनजागृती तसंच कम्युनिटी टॉयलेट बांधली जाणारेत. प्रत्येक झोपडीत शौचालय बांधणे शक्य नसल्यानं कम्युनिटी टॉयलेट बांधण्यावर भर दिला जाणाराय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.