... अन्यथा तुमचा केबल होईल बंद!

केबल उपभोक्त्यांना दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) अखेरची मुदत दिली आहे. कस्टमर अॅप्लिकेशम अर्ज (सीएएफ) अद्यापही न भरल्यामुळे दूरसंचार नियामक प्राधिकरणाने हे अर्ज भरण्यासाठी २५ जूनची अखेरची तारिख दिलेली आहे. दिलेल्या आवाहनाला आता शेवटचे दोन दिवस उरले आहेत.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jun 24, 2013, 02:24 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
केबल उपभोक्त्यांना दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) अखेरची मुदत दिली आहे. कस्टमर अॅप्लिकेशम अर्ज (सीएएफ) अद्यापही न भरल्यामुळे दूरसंचार नियामक प्राधिकरणाने हे अर्ज भरण्यासाठी २५ जूनची अखेरची तारिख दिलेली आहे. दिलेल्या आवाहनाला आता शेवटचे दोन दिवस उरले आहेत. त्यामुळे जर हे अर्ज भरले गेले नाही तर त्यांची केबल सेवा खंडीत करण्यात येईल असा ईशारा (ट्राय) ने दिला आहे.
केबल डिजिटायजेशन प्रक्रियेंतर्गत काही ग्राहकांनी डिजीटल अॅड्रेसिबल केबल टीव्ही सिस्टिम (डीएएस) सेट टॉप बॉक्स बसवले आहेत. पण, (डीएएस) साठी आवश्यक ग्राहक अर्ज अद्यापही भरलेले नाहित. या अर्जामध्ये केबल आणि मल्टी सिस्टिम वाहिन्यांची निवड, सेवा याबाबतही माहिती भरणे बंधनकारक आहेत.

जे ग्राहक हे अर्ज २५ जूनपर्यंत भरणार नाहित त्यांची केबल सेवा बंद केली जाईल असे ट्रायने सांगितले आहे. केबल ऑपरेटर्सकडे जमा होणारे सीएएफ नंतर मल्टीसिस्टिम ऑपरेटर्सकडे जमा केले जातील. केबल ऑपरेटर्स आणि मल्टी सिस्टिम ऑपरेटर्सकडून हे अर्ज न भरले गेल्यामुळेच ट्रायने ही कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्राहकांकडून त्यांच्या आवडी, निवडी तसेच पसंतीची माहिती याद्वारे मिळणार असल्याने केबल ऑपरेटर्स आणि एमएसओंनाही त्यांची देयके तयार करण्यासाठी ही माहिती उपयुक्त ठरेल, असा ट्रायचा विश्वारस आहे. केबल सेवेसाठी ग्राहकांना अर्ज दाखल करण्याच्या आवाहनाचे ऍलर्ट केबल ऑपरेटर आणि एमएसओकडून वाहिन्यांवर दाखवण्यात येत आहेत.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.