मुंबई महापालिका गाडी घेणाऱ्यांना दणका देणार ?

मुंबईतल्या प्रदुषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई महापालिकेनं आता नामी शक्कल काढली आहे. 

Updated: Feb 18, 2016, 08:52 AM IST
मुंबई महापालिका गाडी घेणाऱ्यांना दणका देणार ? title=

मुंबई: मुंबईतल्या प्रदुषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई महापालिकेनं आता नामी शक्कल काढली आहे. 

गाड्यांच्या खरेदी आणि नोंदणीवर नियंत्रण आणण्याचा प्रस्ताव मुंबई महापालिकेनं ठेवला आहे. महिन्याभरापूर्वीच्या या प्रस्तावानुसार एका वर्षात मुंबईत किती गाड्यांची नोंदणी करायची यासाठी एक संख्या निश्चित करण्यात यावी असं म्हटलं आहे.  

याशिवाय शहराच्या काही विशिष्ठ भागात प्रवेशाआधी गाड्यांवर कंजेशन टॅक्स लावण्याचीही तरतूदही या नव्या प्रस्तावात करण्यात आली आहे. या प्रस्तावानुसार दिवसातले काही तास ठरवून दिलेल्या परिसरांमध्ये कार आणि बाईक्सना प्रवेश करण्यासाठी मोठी रक्कम अदा करावी लागेल. 

त्यामुळे त्या भागांमध्ये होणारी वाहतूकीची कोंड़ी तर कमी होईल, तसंच प्रदूषण नियंत्रणासही मदत होईल असं प्रस्तावात म्हटलंय.