दारुड्यांना धडा शिकवण्यासाठी पोलिसही 'कॅशलेस'!

न्यू इयर सेलिब्रेशनचा धांगडधिंगा लक्षात घेता मुंबई पोलिसांनी ड्रंक अँड ड्राईव्ह विरोधात जोरदार मोहीम सुरू केलीय. यावर्षी पोलीस कॅशलेस पद्धतीने दंड वसूल करणार आहेत. मुंबईत मद्य पिऊन गाडी चालणाऱ्यांची संख्या दरवर्षी वाढतच चाललीय. यावर अंकूश आणण्यासाठी मुंबई पोलिसांनी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केलेत. पण त्यांना यश येताना दिसत नाहीय.

Updated: Dec 28, 2016, 12:15 AM IST
दारुड्यांना धडा शिकवण्यासाठी पोलिसही 'कॅशलेस'! title=

अजित मांढरे, मुंबई : न्यू इयर सेलिब्रेशनचा धांगडधिंगा लक्षात घेता मुंबई पोलिसांनी ड्रंक अँड ड्राईव्ह विरोधात जोरदार मोहीम सुरू केलीय. यावर्षी पोलीस कॅशलेस पद्धतीने दंड वसूल करणार आहेत. मुंबईत मद्य पिऊन गाडी चालणाऱ्यांची संख्या दरवर्षी वाढतच चाललीय. यावर अंकूश आणण्यासाठी मुंबई पोलिसांनी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केलेत. पण त्यांना यश येताना दिसत नाहीय.

- 2013 मध्ये  दारू पिऊन गाडी चालणाऱ्या 16, 525 तळीरामांवर कारवाई करण्यात आली

- 2014 मध्ये 16,013 तळीरामांवर कारवाई करण्यात आली

- 2015 मध्ये 17,864 जणांवर कारवाई केली

- 2016 मध्ये 25 डिसेंबरपर्यंत 20,046 तळीरामांवर कारवाई करण्यात आलीय

म्हणजे सतत कारवाई होऊनही तळीरामांची संख्या वाढतच आहे. गंभीर बाब म्हणजे कारवाई झालेल्यांपैकी बहुतांश 18 ते 30 वयोगटातले आहेत, अशी माहिती ट्राफीक सहपोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिलीय.

विशेष म्हणजे, यावर्षी कारवाई करताना पोलिसांनी कॅशलेस होण्याचा निर्णय घेतलाय. म्हणजे पोलिसांकडे तुम्ही आत्ता कॅश नसल्याची सबब देऊ शकणार नाही. कारण पोलीस हातात स्वाईप मशिन्स घेऊन असणार आहेत. डेबिट किंवा क्रेडीट कार्डाच्या माध्यमातून तुम्ही दंड भरू शकता.

त्यामुळे मुंबईकरांनो नव्या वर्षाचं स्वागत करताना उत्साह नक्की असू दे, पण त्या उत्साहाला दारूचा गंध नको. दंड होणार या भितीने नाही तर स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षेसाठी दारू पिऊन गाडी चालवू नका. कारण 2017 मध्ये तुमच्या इतकाच इतरांनाही जगण्याचा अधिकार आहे हे पक्कं लक्षात ठेवा...