VIDEO : मुलीच्या जन्माच्या सेलिब्रेशनसाठी निघालेल्या बापाचा रेल्वेखाली मृत्यू

नवजात मुलीला पाहण्यासाठी आणि हा आनंद सेलिब्रेट करण्याठी निघालेल्या एका पित्याला घाईची किंमत आपला जीव गमावून चुकवावी लागलीय. 

Updated: Feb 12, 2016, 04:54 PM IST
VIDEO : मुलीच्या जन्माच्या सेलिब्रेशनसाठी निघालेल्या बापाचा रेल्वेखाली मृत्यू title=

मुंबई : नवजात मुलीला पाहण्यासाठी आणि हा आनंद सेलिब्रेट करण्याठी निघालेल्या एका पित्याला घाईची किंमत आपला जीव गमावून चुकवावी लागलीय. 

मुंबईच्या विलेपार्ले स्टेशनवर चालत्या ट्रेनमध्ये चढताना ३० वर्षीय रामवरन चौपाल यांचा अपघाती मृत्यू झालाय. घाईत पकडलेल्या ट्रेनचा हात सुटून ते फलाटावर फरफटत गेले....

रामवरन चौपाल यांना आपल्याला मुलगी झाल्याचं समजल्यानंतर त्यांनी आपल्या घरी पार्टीचं आयोजन केलं होतं... पण, पार्टीच्या दिवशी त्यांना थोडा उशीर झाला... आणि घाई-गरबडीत विलेपार्ले स्टेशनवर त्यांनी धावती ट्रेन पकडण्याचा प्रयत्न केला. 

याच प्रयत्नात त्यांना पाय घसरला... प्लॅटफॉर्मवरच ते खेचले जाऊ लागले... आणि थोड्या अंतरावर ते ट्रेनच्या खाली सापडले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झालीय. या अपघातात रामवरन जागीच ठार झालेत.