'मरे' फास्ट होणार, 15 नोव्हेंबरपासून नवं वेळापत्रक

मध्य रेल्वेचा प्रवास आणखी फास्ट होणार आहे. मध्य रेल्वेचं नवं वेळापत्रक 15 नोव्हेंबरपासून लागू होतंय. या नव्या वेळापत्रकात लोकल फेऱ्या वाढवण्यात आल्यात. या विस्तारामुळं लांब अंतरावरील प्रवाशांना फायदा होणार आहे. 

Updated: Nov 13, 2014, 02:49 PM IST
'मरे' फास्ट होणार, 15 नोव्हेंबरपासून नवं वेळापत्रक title=

मुंबई: मध्य रेल्वेचा प्रवास आणखी फास्ट होणार आहे. मध्य रेल्वेचं नवं वेळापत्रक 15 नोव्हेंबरपासून लागू होतंय. या नव्या वेळापत्रकात लोकल फेऱ्या वाढवण्यात आल्यात. या विस्तारामुळं लांब अंतरावरील प्रवाशांना फायदा होणार आहे. 

त्याचप्रमाणे फास्ट लोकलचा वेग १०० किमी प्रति तास झाल्याचा फायदा होणार आहे. नव्या वेळापत्रकात विस्ताराच्या धोरणामुळं अतिरिक्त सुमारे ६८४ किमी अंतर जास्त कापण्यात येईल. मध्य रेल्वेवर दररोज ८२५ लोकल फेऱ्या होतात. या लोकलमधून दररोज ४४ हजार ५७२ किमी अंतर कापलं जातं. 

नव्या वेळापत्रकानुसार यापुढं ६४८ किमी जास्त म्हणजे ४५ हजार २२० किमी एवढं अंतर कापलं जाणार आहे. नव्या विस्तारात शेवटची लोकल एकनंतर सोडण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आलंय. उलट शेवटची कर्जत लोकल 8 मिनिटे आधी सुटणार आहे. त्यामुळं शेवटची लोकल पकडण्यासाठी प्रवाशांना अधिक लगबग करावी लागणार आहे.

नव्या वेळापत्रकानुसार प्रवाशांचा वेळ कसा वाचणार आहे त्यावर एक नजर टाकूया... 

  • मध्य रेल्वे होणार आणखी फास्ट
  • 15 नोव्हेंबरपासून मध्य रेल्वेचे नवे वेळापत्रक
  • नव्या वेळापत्रकात वाढणार लोकलच्या फे-या
  • विस्ताराचा फायदा लांब अंतरावरील प्रवाशांना  
  • शेवटची लोकल मात्र आठ मिनिटे आधी!
  • नव्या वेळापत्रकात लोकल फेऱ्या वाढणार, फास्ट लोकलचा वेग 100 किमी प्रतितास
  • फास्ट मार्गावरील धाववेळ कमी करण्यात आली
  • सीएसटी-कल्याण अंतर 60 मिनिटांऐवजी 58 मिनिटांत कापता येणार
  • कल्याण-कर्जत अंतर 54 मिनिटांऐवजी 50 मिनिटांत
  • कल्याण-कर्जत अंतर 54 मिनिटांऐवजी 50 मिनिटांत
  • कल्याण-कसारा अंतर 75 मिनिटांऐवजी 70 मिनिटांत कापणं शक्य

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.