भुजबळ जेलमध्ये गेल्यानंतरचा पहिला व्हिडीओ

 छगन भुजबळांचा फोटो व्हायरल झाल्यानंतर, छगन भुजबळांचा व्हिडीओ आज मीडियासमोर आला आहे. 

Updated: Apr 25, 2016, 05:20 PM IST

मुंबई : छगन भुजबळांचा फोटो व्हायरल झाल्यानंतर, छगन भुजबळांचा व्हिडीओ आज मीडियासमोर आला आहे. 

छगन भुजबळ जेलमध्ये गेल्यानंतर त्यांचा हा पहिलाच व्हिडीओ आहे, यावरून रविवारी इंटरनेट मीडियात भुजबळांचा जो फोटो व्हायरल झाला, तो छगन भुजबळ यांचाच होता हे स्पष्ट होत आहे.

छगन भुजबळ यांची आज सेंट जॉर्ज रूग्णालयातून, आज आर्थर रोड जेलमध्ये रवानगी करण्यात आली, त्यावेळी छगन भुजबळांची छबी मीडियाच्या कॅमेऱ्यात कैद झाली.