मुंबई : दुष्काऴग्रस्त मराठवाड्यातल्या चारा छावण्या बंद करण्याचा निर्णय़ राज्य सरकारनं घेतलाय.
बीड, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यात रब्बी हंगामात मुबलक चारा उपलब्ध झालाय. त्यामुळं मेपर्यंत चा-याची अडचण नसल्याचा दावा राज्य सरकारनं केलाय.
यासंदर्भात मंत्रालयात बैठक झाली असून तसं पत्र विभागीय आयुक्तांना पाठवण्यात आलंय. तर चारा छावण्या बंद करण्याच्या निर्णयाचा सरकारनं फेरविचार करावा अशी मागणी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचा दावा मुंडेंनी केलाय.
दरम्यान, चारा छावण्या बंद करण्याच्या सरकारच्या निर्णयावर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी तीव्र शब्दात टीका केलीय.