नवी मुंबई : नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक शंकर मोरे यांना ८१ लाखांचा गंडा घालण्यात आल्याचं समोर आलंय.
कोपरखैरणे येथील नगरसेवक शंकर मोरे यांच्या शेजारी दूध डेअरी चालवणाऱ्या कुंवर दाम्पत्याने घर खरेदीसाठी दोन दिवसांच्या बोलीवर मोरे यांच्याकडून ८१ लाख रूपये घेतले होते.
या बदल्यात मोरे यांना तीन लाख रूपये अधिक दिले जाणार होते. मोरे यांनी तीन लाखाच्या आमिषापोटी स्वत:च्या पतपेढीतून सहा लाख रूपयांचे कर्ज काढलं. घरातील सर्व दागिने गहाण ठेवले.
एव्हढंच नव्हे तर मिञ परिवाराकडूनही पैसे घेवून मोरे यांनी ८१ लाखांची जमवाजमव करून कुंवर दाम्पत्याला दिले.
माञ, या कुंवर दाम्पत्याने दुसऱ्याच दिवशी नवी मुंबईतून पळ काढला. कोपरखैरणे पोलीस आता एकराज सिंग कुंवर, पत्नी सरस्वती सिंग आणि मुलगा कृष्णा सिंग कुंवर या कुटुंबाचा शोध घेत आहेत.